विद्यार्थ्यांचा ऑनलाइन प्रवेशाचा डाटा पोर्टलवर अपलोड करावा दत्तात्रय सांगळे यांची मागणी,

विद्यार्थ्यांचा ऑनलाइन प्रवेशाचा डाटा पोर्टलवर अपलोड करावा दत्तात्रय सांगळे यांची मागणी,
Published on: 
ऑनलाइन प्रवेशाचा डाटा पोर्टलवर टाका ------------- सांगळे यांची मागणी, बारावीच्या आवेदनपत्रांबाबत संभ्रम कायम -------------- सकाळ वृत्तसेवा येवला, ता. ६: बारावीच्या परीक्षेच्या ऑनलाइन आवेदनपत्र प्रक्रियेत विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः एमसीव्हीसी, आयटीआय तसेच अकरावीला प्रवेश घेतल्यानंतर ऑनलाइन प्रवेश प्रणालीमध्ये डाटा उपलब्ध नाही, अशा विद्यार्थ्यांच्या आवेदनपत्रांबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांचा ऑनलाइन प्रवेशाचा डाटा पोर्टलवर अपलोड करावा अशी मागणी अशी मागणी राज्य कलाशिक्षक महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष दत्तात्रय सांगळे यांनी केली आहे. राज्य मंडळाने सर्व विभागीय मंडळांना पाठविलेल्या पत्रामध्ये आवेदनपत्रे भरण्याबाबत सविस्तर सूचना दिल्या आहेत. अकरावीला प्रवेशित विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन डाटावरून पॉपअप करून भरून घेण्यात येणार आहेत. यासाठी यापूर्वीच्या प्रणालीतील पीएफएन-आयडीचा वापर न करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मात्र, एमसीव्हीसी व आयटीआय विद्यार्थ्यांचा डाटा ऑनलाइन एफवायजेसी प्रणालीमध्ये उपलब्ध नसल्यामुळे त्यांची आवेदनपत्रे थेट भरण्याच्या सूचना मंडळाने दिल्या आहेत. याशिवाय, ज्या विद्यार्थ्यांचा डाटा एफवायजेसी ऑनलाइन प्रणालीमध्ये उपलब्ध नाही, अशा विद्यार्थ्यांनी आवश्यक माहिती घेऊन संबंधित विभागीय मंडळात प्रत्यक्ष उपस्थित राहावे. विद्यार्थ्यांकडून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे विभागीय मंडळांनी सॉफ्ट डाटा तयार करून तो पोर्टलवर अपलोड करावा, जेणेकरून संबंधित विद्यार्थ्यांना आवेदनपत्रे भरता येतील, असे स्पष्ट निर्देश या पत्रामध्ये देण्यात आले आहेत. याबाबतची एसओपी स्वतंत्रपणे कळविण्यात येणार असल्याचेही मंडळाने नमूद केले आहे. ---------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com