नाशिक- ऑनलाइन व्यवहारामध्ये फसवणुकीचे प्रमाण सध्या वाढत आहे. यासाठी कुणाचे तरी बँक खाते हे भाडेतत्त्वावर घेतले जाते. भाडेतत्त्वावर घेतल्या जाणाऱ्या अकाउंटचा सध्या सुळसुळाट आहे. विशेष म्हणजे मौजमजा करण्यासाठी तरुण पिढी या ‘किराया बँक खाता’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रलोभनाला बळी पडत आहे.