नाशिक रोड/ नाशिक- ऑनलाइन जुगाराचा वाढता विळखा दिवसेंदिवस तरुणाईभोवती अधिकच घट्ट होत चालला आहे. अवघ्या १६ वर्षांच्या दहावीतील विद्यार्थ्याने ऑनलाइन जुगारात पैसे गमावल्याच्या नैराश्यातून बुधवारी (ता. ९) पहाटेच्या सुमारास राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. नाशिक रोड परिसरातील डायमंडनगर येथे ही घटना घडली असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. यानिमित्ताने ऑनलाइन जुगाराचा गंभीर धोका पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.