esakal | म्युकरमायकोसिस औषधांची ऑनलाइन नोंदणी गरजेची; चिठ्ठी लिहून दिल्यास कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

kailas jadhav

कोरोनाबाधित रुग्ण उपचाराअंती बरे झाल्यानंतर आता म्युकरमायकोसिस आजाराचा त्रास सहन करावा लागत आहे. बुरशीजन्य या आजारामुळे रुग्ण दगावण्याची शक्यता अधिक आहे. त्यावर उपचारासाठी ॲम्फोटेरेसिन बी इंजेक्शनचा वापरले जाते.

म्युकरमायकोसिस औषधांची ऑनलाइन नोंदणी गरजेची

sakal_logo
By
विक्रांंत मते

नाशिक : शहरामध्ये म्युकरमायकोसिस (Mucormycosis) रुग्णांची संख्या वाढत असताना या आजारावर उपचार करण्यासाठी ॲम्फोटेरेसिन- बी इंजेक्शनची (Amphotericin b Injection) गरज निर्माण झाली आहे. परंतु, रुग्णालयाकडून नातेवाइकांना परस्पर चिठ्ठी लिहून महापालिका तसेच खासगी रुग्णालयाकडे डॉक्टरांकडून पाठविले जाते. यात नातेवाइकांची हेळसांड होत असल्याने या पार्श्‍वभूमीवर म्युकरमायकोसिस आजारावर उपचार करणाऱ्या रुग्णालयांना नोटिसा बजावण्याच्या सूचना आयुक्त कैलास जाधव यांनी दिल्या. (Online registration of Mucormicosis drugs is required Nashik Instructions by municipal commissioner Jadhav)

कोरोनाबाधित रुग्ण उपचाराअंती बरे झाल्यानंतर आता म्युकरमायकोसिस आजाराचा त्रास सहन करावा लागत आहे. बुरशीजन्य या आजारामुळे रुग्ण दगावण्याची शक्यता अधिक आहे. त्यावर उपचारासाठी ॲम्फोटेरेसिन बी इंजेक्शनचा वापरले जाते. मात्र शहरात या इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. महापालिका हद्दीमध्ये आत्तापर्यंत ३०१ रुग्ण आढळले असून एका रुग्णाला दररोज चार इंजेक्शन द्यावे लागते. रुग्णसंख्या लक्षात घेता महापालिकेला दररोज बाराशे इंजेक्शनची आवश्‍यकता आहे. परंतु, फक्त शंभर ते सव्वाशे इंजेक्शन प्राप्त होत आहेत. एका रुग्णाला ८० ते ९० इंजेक्शन लागतात. या परिस्थितीत रुग्णांच्या नातेवाइकांची हेळसांड होत आहे. मात्र रुग्णांच्या नातेवाइकांना डॉक्टरांकडून परस्पर चिठ्ठी लिहून दिली जाते. नियमानुसार महापालिकेच्या वेबसाइटवर नोंदणी करावी, अशा शासनाच्या स्पष्ट सूचना आहेत. महापालिकेला जसे इंजेक्शन उपलब्ध होईल, त्याप्रमाणे रुग्णालयाला थेट वितरण केले जाते. असे असताना नातेवाइकांची हेळसांड होत असल्याच्या पार्श्वभूमीवर खासगी रुग्णांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयावर नोटिसा बजावण्याचे सूचना आयुक्त जाधव यांनी दिल्या.

म्युकरमायकोसिस आजारावर उपचारासाठी लागणारे इंजेक्शनची नोंदणी महापालिकेच्या वेबसाइटवर होणे गरजेचे आहे. डॉक्टरांनी नातेवाइकांना परस्पर चिठ्ठी लिहून देवू नये, अन्यथा साथ रोग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कारवाई केली जाईल.

- डॉ. आवेश पलोड, नोडल अधिकारी.

(Online registration of Mucormicosis drugs is required Nashik Instructions by municipal commissioner Jadhav)

हेही वाचा: तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी नाशिक महापालिका सज्ज