
Nashik : पाणीपट्टीची अवघी दीड टक्का वसुली
नाशिक : यंदाच्या आर्थिक वर्षातील साडेतीन महिन्यामध्ये पाणीपट्टीची (Water Tax) अवघी दीड टक्का वसुली झाल्याची बाब समोर आली आहे.
मनुष्यबळाचा अभाव, नागरिकांना वेळेत पाणी बिले न मिळणे आदी महत्त्वाची कारणे यामागे आहेत. पाणीपट्टीची समाधानकारक वसुली होण्यासाठी महापालिका आयुक्त रमेश पवार (NMC commissioner Ramesh Pawar) यांनी ऑनलाइन ॲप (Online app) आणले, परंतु ऑनलाइन ॲप डाऊनलोड करण्याची संख्या अवघे २०० आहे. (Only one half percent recovery of water tax nmc Latest marathi news)
हेही वाचा: Nashik : शहरात 24 तास लसीकरण केंद्र सुरू करण्याचा निर्णय
पाणीपट्टी वसुलीसाठी २०२२ ते २३ या आर्थिक वर्षासाठी ७५ कोटींची उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. साडेतीन महिन्यात अवघे ९२ लाख १८ हजार ७८६ रुपये वसूल झाले आहे. एक एप्रिल ते १४ जुलै या कालावधीमध्ये सातपूर विभागातून १५ लाख १६ हजार ७९४ रुपये वसूल झाले आहे.
पंचवटी विभागांमध्ये बारा लाख नऊ हजार ४५९ रुपये तर सिडको विभागात २१ लाख ६७ हजार ६९६ रुपये वसूल झाले आहेत. नाशिक रोड विभागांमध्ये २३ लाख २७ हजार ७६७ रुपये पाणीपट्टी वसूल झाली आहे. पश्चिम विभागात एक लाख २२ हजार २०८ रुपये तर पूर्व विभागात १८ लाख ७४ हजार ८६२ रुपये वसूल झाले आहेत.
हेही वाचा: Nashik : आयुक्तालय हद्दीतील 4 विभागाचे नामकरण
Web Title: Only One Half Percent Recovery Of Water Tax Nmc Latest Marathi News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..