नाशिक- दोनशे ८० प्रकारच्या प्रजातीचे झाडे. त्यात ५० वेलींचे प्रकार, ४५ झुडूप, ३२ बांबूचे प्रकार, १६ आंब्याचे प्रकार असलेल्या सातपूर देवराई निसर्गाच्या सानिध्यात खुले वाचनालय साकारत आहे. येथील झाडांना क्यूआर कोड देण्यात आले आहेत. जेणेकरून वाचकांना एखाद्या झाडाविषयी माहिती घ्यावयाची झाल्यास कोड स्कॅन केल्यानंतर त्या झाडाविषयी इत्थंभूत माहिती मिळेल.