Latest Marathi News | वाहनांच्या पुढे लोटांगण घालत अतिक्रमण काढण्यास विरोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Residents of Shahi Marg protesting encroachment.

Nashik : वाहनांच्या पुढे लोटांगण घालत अतिक्रमण काढण्यास विरोध

पंचवटी (जि. नाशिक) : नवीन शाही मार्गावर झोपड्यांचे अतिक्रमण मोठ्या प्रमाणात वाढल्याने ते काढण्यासाठी सोमवारी (ता.१२) दुपारी एकच्या सुमारास महापालिकेचे अतिक्रमण निर्मुलन विभागाचे पथक हजर झाले. मात्र, अतिक्रमण करून झोपड्या उभारलेल्या महिलांनी झोपड्या हटविण्यास विरोध केला.

एका महिलेने तर अतिक्रमण विभागाच्या वाहनात स्वतःला झोकून देण्याचा आणि वाहनांच्या पुढे लोटांगण घालण्याचा प्रयत्न केल्याने हतबल झालेल्या अतिक्रमण निर्मूलन पथकाला कारवाईविना मागे परत फिरण्याची नामुष्की ओढवली. (Opposing encroachment by loitering in front of vehicles nashik Latest Marathi News)

हेही वाचा: सिन्नरला वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालय मंजूर; बार असोसिएशनच्या पाठपुराव्याला यश

नवीन शाही मार्गावर गेली कित्येक महिन्यांपासून अतिक्रमण होत असताना त्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होते. त्यामुळे येथील झोपड्यांची संख्या वाढत गेली. स्मार्ट रोडवरील या झोपड्यांमुळे ‘स्मार्टसिटी की झोपडपट्टी’ असेही या भागाला संबोधले जाऊ लागले. हे अतिक्रमण वाढल्याने त्यांचे निर्मुलन करण्याचा पथकाने सोमवारी मुहूर्त काढला.

पोलिस आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचा ताफा या झोपड्यांकडे वळला. झोपड्या उभारलेल्यांना स्वतःहून झोपड्या हटवून साहित्य येथून हलविण्यास सांगण्यात आले. मात्र, आम्ही येथून हलणार नाही. आमचे साहित्यही उचलू देणार नाही अशी भूमिका झोपडपट्टीवासीयांनी घेतली.

पथकाने कारवाईस सुरवात केली असता, एका महिलेने स्वतःहून तिच्या झोपडीतील साहित्य अतिक्रमण निर्मुलन पथकाच्या वाहनात फेकण्यास सुरवात केली. ते वाहन पुढे जात असताना त्यावर चढण्याचा प्रयत्न केला. तिला महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी ओढून खाली उतरवले.

हेही वाचा: NMC पूर्व विभागीय कार्यालय इमारतीच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष; CCTVची भलतीच घाई

Web Title: Opposing Encroachment By Loitering In Front Of Vehicles Nashik Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :NashikEncroached