Nashik News: जायकवाडीला पाणी सोडण्यास सर्वपक्षीय आमदारांचा विरोध

 Jayakwadi nashik news
Jayakwadi nashik news esakal

Nashik News : समन्यायी पाणीवाटपाच्या आधारे गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने नाशिक व अहमदनगर जिल्ह्यांतून ८.६०३ टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश दिलेले असताना नाशिक जिल्ह्यातील सर्वपक्षीय आमदारांनी मात्र पाणी सोडण्यास विरोध दर्शविला आहे. न्यायालयात यासंदर्भात दाखल याचिकेवर अंतिम निर्णय येईपर्यंत कुठलीही कार्यवाही न करण्याचे आदेश पालकमंत्री दादा भुसे यांनी जलसंपदा विभागाला दिले आहेत.

जिल्ह्यात अभूतपूर्व दुष्काळ असल्याने उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागेल. सद्यःस्थितीत धरणांमध्ये असलेल्या साठ्याचे आकस्मिक आरक्षण ठेवून पाण्याचे नियोजन करण्यासाठी पालकमंत्र्यांनी सोमवारी (ता. ६) बैठक झाली. बैठकीत सर्वपक्षीय आमदारांनी जायकवाडीला पाणी सोडण्यास विरोध केला. (Opposition of MLAs from all parties to release water to Jayakwadi dam nashik news)

जिल्ह्यातील धरणांमधून साधारणत: तीन टीएमसी पाणी जायकवाडीला सोडायचे आदेश आहेत. पण मेंढेगिरी समितीने अहवाल दिला, त्या वेळेची परिस्थिती आणि आत्ताच्या परिस्थितीत फार फरक आहे. पाण्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढल्याने त्याची प्रत्यक्ष वास्तवदर्शी आकडेवारी सादर होत नाही, तोपर्यंत पाणी सोडायचे नाही, असा ठरावच या बैठकीत करण्यात आला.

नाशिकच्या जलसंपदा विभागाने गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाला खोटी आकडेवारी सादर केल्यामुळे जिल्ह्यातून पाणी सोडण्याची वेळ आल्याचा आरोप आमदार देवयानी फरांदे यांनी केला. गंगापूरऐवजी मुकणे धरणातून ३०० दशलक्ष घनफूट पाणी द्या, पण गंगापूरमधून पाणी देण्यास आमचा विरोधच राहील, असेही त्या म्हणाल्या.

जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी सायंकाळपर्यंत धरण साठ्यासंदर्भातील पत्र देण्याची मागणी आमदार फरांदे यांनी केली. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार ॲड. माणिकराव कोकाटे, सरोज आहिरे, हिरामण खोसकर, डॉ. राहुल आहेर, नितीन पवार, दिलीप बनकर यांसह पाटबंधारे, कृषी व महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 Jayakwadi nashik news
Nashik News : जायकवाडीला 8 टीएमसी पाणी सोडण्याचे आदेश; जिल्ह्यातून 3 तर नगरमधून 5 टीएमसी पाणी

आळंदी धरण गंगापूर समूहातून वगळा

गंगापूर धरण समूहातील आळंदी या धरणाचा नाशिक शहराला उपयोग होत नाही. परंतु, हे धरण गंगापूर धरण समूहात असल्यामुळे एकूण पाणीसाठ्यात त्याचा साठा दिसतो. त्यामुळे दर वर्षी जायकवाडीला पाणी सोडण्याची वेळ नाशिककरांवर येते. आळंदी धरण हे गंगापूर धरण समूहातून वगळण्याचे आदेश पालकमंत्री दादा भुसे यांनी जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांना दिले.

न्यायालयात आज सुनावणी

जायकवाडीला पाणी सोडण्याच्या आदेशाला नाशिकमधील शिंदेगावचे शरद तुंगार यांच्या माध्यमातून आमदार देवयानी फरांदे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्या प्रकरणी मंगळवारी (ता. ७) सुनावणी होणार आहे. जायकवाडी धरणात २६ टीएमसी इतका मृतसाठा आहे. त्याचा वापर करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.

 Jayakwadi nashik news
Nashik News: जायकवाडीला पाणी सोडण्याबाबत जिल्हा प्रशासन पेचात; न सोडण्याच्या आदेशाची प्रतीक्षा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com