
Nashik News : मंत्रिमंडळ विस्तारात सार्वजनिक बांधकाम खाते मिळालेले मंत्री दादा भुसे यांनी आपल्या विभागाची बैठक घेत वाहतूक कोंडीवर उपाययोजना सुचविण्याचे आदेश दिले आहेत. पावसाळ्यात वडपे ते ठाणे मार्गावर वाहतूक कोंडी होते.
तसेच ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी होते, अशा ठिकाणी पोलिसांच्या मदतीला वॉर्डन नेमण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत. (Order to appoint warden to solve traffic gridlock Public Works Minister Bhuse held review meeting Nashik)
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी आज मुंबईत आढावा बैठक घेतली. राज्यात ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी होते, अशा ठिकाणांवर लक्ष केंद्रित करून त्या ठिकाणी पोलिसांच्या मदतीला वॉर्डन नेमण्याचे आदेश दिले आहेत.
वाहतुकीच्या समस्या कशा सोडवता येतील, यादृष्टीने उपाययोजना सुचविण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. पावसाळ्यात मुंबईसह महामार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते.
ही कोंडी होणार नाही, यासाठी सतर्क राहण्याच्या सूचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकारी, पोलिस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.