Nashik News: आदिवासी शेतजमीन मिळाली मूळ मालकाला! बिरसा ब्रिगेड आदिवासी संघटनेचा पाठपुरावा

Officials and activists of Birsa Brigade tribal organization celebrating the return of agricultural land to the original owner.
Officials and activists of Birsa Brigade tribal organization celebrating the return of agricultural land to the original owner.esakal
Updated on

Nashik News : बिगर आदिवासीने २७ वर्षांपासून बळकावलेली गरबड (ता. मालेगाव) येथील शेतजमीन मूळ आदिवासी शेतकऱ्याला बिरसा ब्रिगेड आदिवासी संघटनेच्या अथक प्रयत्नांनी परत मिळाली. (original owner got tribal farm land Pursuit of Birsa Brigade tribal organization Nashik News)

जमीन मूळमालकाला परत मिळावी, यासाठी बिरसा ब्रिगेड संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल गभाले व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी शासन स्तरावर पाठपुरावा केला.

तहसीलदार नितीनकुमार देवरे यांच्या आदेशाने मंडलाधिकारी एस. एस. गोसावी, तलाठी राहुल पाटील, पोलिस उपनिरीक्षक मनोज पवार यांनी पंचनामा करून मळू मालक आदिवासी शेतकऱ्याला जमिनीचा कब्जा दिला.

इगतपुरी तालुक्यात आदिवासींच्या वडिलोपार्जित शेतजमिनी अनेक व्यावसायिक व बिगर आदिवासी दलालांनी बळकावून त्यावर हॉटेल्स, फार्म हाऊस, बंगले बनवून आदिवासींना भूमिहीन केले आहे, तर अनेक आदिवासींवर हल्ले करून अन्याय केला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

पीडीत आदिवासी शेतकऱ्यांच्या वडिलोपार्जित जमिनी त्यांना मिळवून देण्यासाठी बिरसा ब्रिगेड संघटना संघर्ष करणार असल्याचे संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल गभाले यांनी सांगितले.

बिरसा ब्रिगेड दिंडोरी तालुकाध्यक्ष सर्जेराव भारमल, गरबडचे सरपंच चिंतामण भांगरे, पोलिसपाटील संतोष भांगरे, ग्रामपंचायत सदस्य भिला पेढेकर, शेतकरी प्रमोद सबगर, नामदेव जाधव, जनाबाई भोईर, सटाणा तालुकाध्यक्ष निवृत्ती गातवे, चांदवडचे अध्यक्ष गोरख नाडेकर, गोरख भांगरे, वसंत भांगरे, अनिल सबगर, लखन भांगरे, लालजी भांगरे, नाना रगतवान, बाबाजी भांगरे, राजेंद्र घोडे, नागू गुमाडे, विक्रम गुमाडे, अण्णा भांगरे, सुक्राम गुमाडे, अण्णा रगतवान, हरी नाडेकर, प्रभाकर गुमाडे आदींनी जल्लोष केला.

Officials and activists of Birsa Brigade tribal organization celebrating the return of agricultural land to the original owner.
Inspirational News: सोनवणे दांपत्य भागवतात निराधारांची भूक! माणुसकीच्या नात्याने मदतीचा प्रयत्न

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com