नाशिक- जिल्ह्यातील सहकारी बँकांसह खासगी क्षेत्रातील बँकांनी वर्षभरात वाटप केलेल्या सहा हजार ४०० कोटी रुपयांच्या पीककर्जापैकी एक हजार ५८४ कोटींचे पीककर्ज थकीत आहे. ३१ मार्चअखेर कर्जवसुलीचा अहवाल अंतिम केला जातो. त्याची कार्यवाही आता बॅंकांमार्फत सुरू झाली आहे. त्रैमासिक अहवालात हा आकडा अजून वाढण्याची शक्यता वर्तविली जाते.