
Saptashrungi Devi Gad : आदिमायेच्या नवरात्र आरतीने सप्तशृंगी गडावर नवरात्रोत्सवातील ललिता पंचमीचा जागर करीत ४० हजारांवर भाविक गुरुवारी (ता. ४०) आदिमायेच्या चरणी नतमस्तक झाले.
ललितादेवी दहा महाविद्यांपैकी एक आहे. नवरात्रीच्या पाचव्या माळेस ललिता पंचमीचे व्रत केले जाते आणि विधीनुसार देवी सतीच्या रूपात ललितादेवीची पूजा केली जाते.
ललितादेवीला चंडीचे स्थान मिळाले आहे. हे काम्य व्रत आहे. ललितादेवी या व्रताची देवता आहे. पूजाविधी, व्रत करीत आरोग्य, सुख-समृद्धीसाठी आदिमायेस हजारो महिलांनी कडे घातले. (Over 40000 devotees come to saptashrungi gad due to lalita panchami nashik news)
ललिता पंचमीला कोहळा पंचमीही म्हटले जाते. ललिता पंचमीच्याच दिवशी महालक्ष्मीने कोल्हासुराचा वध केला. त्यामुळे देवीच्या विविध धार्मिकस्थळी कोहळा फोडून प्रतिकात्मक बळी दिला (कुष्मांड बळी) जातो. देवीच्या दर्शनास या दिवशी विशेष महत्त्व असल्याने भाविकांच्या गर्दीत वाढ झाली होती.
ललिता पंचमीची श्री भगवतीची पंचामृत महापूजा नाशिकचे धर्मादाय आयुक्त तुफानसिंग अकाली व कळवणचे तहसीलदार तथा श्री सप्तश्रृंग निवासिनी देवी ट्रस्टचे विश्वस्त रोहिदास वारुळे यांनी परिवारासमवेत केली. ट्रस्टचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, कार्यालयीन अधीक्षक प्रकाश जोशी, जनसंपर्क अधिकारी भिकन वाबळे, मंदिर सहा विभागप्रमुख विश्वनाथ बर्डे, सुनील कासार, प्रशांत निकम उपस्थित होते.
दरम्यान, शुक्रवार (ता. २०)पासून पुढील चारही दिवस मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने प्रशासकीय यंत्रणा व राज्य परिवहन महामंडळाने नाशिकसह जिल्ह्यातील वेगवेगळया आगारातून थेट गडापर्यंत अधिक बसेे सोडण्याचे नियोजन केले आहे.
शनिवारी (ता. २१) सप्तमीचा सर्वांत महत्त्वाचा दिवस मानला जातो. सप्तमी उत्सवास हजेरी लावण्यासाठी ठिकठिकाणाहून हजारो भाविक पदयात्रेने गडाकडे मार्गस्थ होऊ लागले आहेत. दरम्यान, गुरुवारी गडावर खानदेशासह जिल्हाभरातून आलेल्या भाविकांनी पारंपरिक पद्धतीने चक्रपूजा केली.
ललितादेवीचे ध्यानमंत्र -
नील कौशेयवसनां हेमाभं कमलासनाम।
भक्तांना वरदां नित्यं ललितां चिन्तयाम्यहम्।।
‘‘कमलावर अधिष्ठित, निळे, रेशमी वस्त्र परिधान करणारी, सुवर्णकांतीची, भक्तांना नित्य वर देणारी अशा ललितेचे मी चिंतन करतो.’’
या पूजाविधानात पुष्पांजली समर्पण झाल्यावर गंधाक्षता युक्त व साग्र अशा ४८ दुर्वा ललितेला वाहतात. नैवैद्यासाठी लाडू, वडे, घारगे वगैरे पदार्थ करतात. पूजेच्या शेवटी घारग्यांचे वायन (वाण) देतात. रात्री जागरण व कथा श्रवण करतात. दुसऱ्या दिवशी ललितादेवीचे विसर्जन करतात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.