Water Tanker
sakal
नाशिक - जुलै महिना अर्ध्याहून अधिक संपला, तरी उत्तर महाराष्ट्रात अपेक्षित पावसाने अद्याप हजेरी लावलेली नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील पाणीटंचाई अधिक तीव्र झाली असून, नाशिक विभागातील नाशिक, जळगाव आणि अहिल्यानगर या तीन जिल्ह्यांत सध्या २८२ टँकर कार्यरत आहेत. या टँकरच्या माध्यमातून सहा लाख १८ हजार ८०९ नागरिकांची तहान भागविली जात आहे. यामध्ये नाशिक जिल्ह्याला टंचाईची सर्वाधिक झळ बसली असून, धुळे आणि नंदुरबार हे जिल्हे सुदैवाने टँकरमुक्त आहेत.