धुळे : टुडे पान २ साठी..
--
संकटांना आत्मविश्वासाने सामोरे जावे
--
प्रा. दाते : बियाणी विधी महाविद्यालयात गटचर्चा
सकाळ वृत्तसेवा
धुळे, ता. २६ : शहरातील प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या अनुभवांतून शिकले पाहिजे, कोणत्याही परिस्थितीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे आणि जीवनात येणाऱ्या संकटांना व आव्हानांना आत्मविश्वासाने सामोरे गेले पाहिजे, असे प्रतिपादन प्रा. डॉ. सुषमा दाते यांनी केले.
शहरातील एस. एम. बियाणी विधी महाविद्यालयातील मूट कोर्ट हॉलमध्ये ‘One Day You Will Lose Your Blue Bag’ या पुस्तकावर आधारित गटचर्चा व जीवनकौशल्य मार्गदर्शन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. प्रा. डॉ. आशिष गांगुर्डे, प्रा. अपर्णा पाठक, प्रा. मृण्मयी जोशी, प्रा. हितेश पाटील, प्रा. सुष्मिता पवार, श्रावणी गुडढेकर, जगदीश गायकवाड यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.
मार्गदर्शनानंतर विद्यार्थ्यांसाठी पुस्तकावर आधारित गटचर्चेचे आयोजन करण्यात आले. या चर्चेत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत पुस्तकातील विविध प्रसंग, विचार आणि संदेश यांवर आपली मते मांडली. पुस्तकातील विचारांचा स्वतःच्या जीवनाशी, अनुभवांशी व भविष्यातील वाटचालीशी संबंध जोडून विद्यार्थ्यांनी विविध संदर्भांसह विचार प्रभावीपणे व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास, निर्णयक्षमता, नातेसंबंध, जबाबदारी, सकारात्मक विचारसरणी आणि व्यक्तिमत्त्व विकास यांसारख्या विषयांवरही आपले दृष्टिकोन मांडले. संस्थेचे अध्यक्ष सीए के. यू. नाबरिया, सचिव शिल्पा म्हस्कर, उपाध्यक्षा ॲड. सारंगी गुजराती यांचे सहकार्य झाले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, वैचारिक आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी अशा उपक्रमांचे आयोजन केल्याबद्दल पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.