esakal | Breaking : धक्कादायक! नाशिक शहरातील 5 हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा

बोलून बातमी शोधा

nashik oxygen
Breaking : धक्कादायक! नाशिक शहरातील 5 हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा
sakal_logo
By
टीम ई सकाळ

नाशिक : डॉ झाकीर हुसेन रुग्णालय मधील ऑक्सिजन गळतीमुळे श्वास गुदमरून 24 रुग्णांचा मृत्यू झाला. नाशिक शहरातील पाच हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा असल्याचे माहिती समोर येत आहे. दरम्यान नाशिक शहरातील अपेक्स, नारायणी, आयुष, नेरलीकर हॉस्पिटलला ऑक्सिजन नव्हता. नाशिक, सिन्नर हुन ड्युरा टॅंक मागवून आणि इतर हॉस्पिटलनी सिलेंडर देऊन ऑक्सिजन गरज रात्री भागवली गेली. पण आता 3 तासात सिक्स सिग्मा हॉस्पिटल मध्ये ऑक्सिजन संपतोय. नातेवाईक जमा झालेत. मुरबाड हुन टँकर येण्यास विलंब झाला. त्याचवेळी संगमनेर ऐवजी नाशिकहून मालेगाव ला ऑक्सिजन द्यावा लागत आहे. आय एम ए तर्फे ही माहिती सांगण्यात आली. सिक्स सिग्मा रुग्णालयातील वीस रुग्णांना हलविण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती आहे आहे. (सविस्तर वृत्त अपडेट होत आहे)