नाशिक- ओझर विमानतळावरून उड्डाण होणाऱ्या विमानांना महापालिका हद्दीतील इमारतींची उंची बाधक ठरण्याची शक्यता लक्षात घेऊन हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) कंपनीने धावपट्टीपासून २० किलोमीटर अंतरावर इमारत बांधकामाची परवानगी देताना अभिप्राय अनिवार्य करण्याचे पत्र महापालिकेला सादर केले यानंतर त्यावर विधान परिषदेत लक्षवेधीदेखील मांडली आहे. तर दुसरीकडे महापालिकेने पुन्हा एकदा फनेल झोन नकाशा मागविण्याबरोबरच जिल्हाधिकाऱ्यांकडेदेखील एचएएल व महापालिकेची बैठक बोलाविली आहे.