नाशिक- ओझर विमानतळावरून आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानसेवेसाठी पायाभूत सुविधा अपूर्ण आहेत. कार्गो व चार्टर्ड फ्लाइट्ससाठी जागा उपयोगी असल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले. खासदार राजाभाऊ वाजे यांनी यासंदर्भात संसदेत प्रश्न उपस्थित केला. पण, शासनाची भूमिका अस्पष्ट असल्याने ओझरहून थेट परदेशी जाण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नाशिककरांचा अपेक्षाभंग झाला आहे.