विमानतळ रस्ता विकास

विमानतळ रस्ता विकास
Published on: 
एन्कर सिंहस्थापूर्वी विमानतळ रस्ता होणार ३० मीटर रुंद १६.७१ कोटींच्या कामाला स्थायीची मंजुरी; वाहतुकीचा ताण हलका सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २३ : पंचवटी विभागातील म्हसरूळ ते वरवंडी या ओझर विमानतळ रस्त्याच्या रुंदीकरण केले जाणार आहे. रस्ते कामासाठी १६ कोटी ७१ लाख रुपयांच्या निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. या निर्णयामुळे कुंभकाळातील वाहतुकीचा ताण हलका होणार आहे. तसेच अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना या मार्गाने रामतीर्थाकडे आणणे सोपे होणार आहे. तसेच प्रस्तावित रिंग रोडला हा रस्ता जोडून त्र्यंबकेश्वरलादेखील या व्यक्तींची ने -आण सोपी होणार आहे. विकास आराखड्यात हा रस्ता ३० मीटर रुंद दाखवण्यात आला आहे. प्रत्यक्षात मात्र चार किलोमीटर लांबीचा रस्ता अवघा ३.७५ मीटर रुंद असून ठिकठिकाणी खड्ड्यांमुळे त्याची चाळण झाली आहे. अरुंद रस्त्यामुळे सध्या वाहनचालकांना कसरत करावी लागते. कुंभमेळ्यात लाखो भाविकांची गर्दी लक्षात घेता या रस्त्याचे रुंदीकरण, डांबरीकरण आणि पावसाळी पाण्याच्या निचऱ्यासाठी ड्रेनेज व्यवस्था उभारण्यात येणार आहे. या कामासाठी नाशिक- त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने २० कोटी ६४ लाख ४६ हजार रुपयांची प्रशासकीय मान्यता दिली होती. सार्वजनिक बांधकामाच्या दरसूचीनुसार स्थापत्य कामासाठी १९.२८ कोटी आणि विद्युत व्यवस्थेसाठी १.३६ कोटींचे प्राकलन तयार करण्यात आले होते. महापालिकेच्या ई-निविदेत एकूण १० निविदा आल्या, त्यापैकी सात तांत्रिकदृष्ट्या पात्र ठरल्या. मुंबईच्या मे. बिटकॉन इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्सने प्राकलित दरापेक्षा १९.९९ टक्के कमी दराने निविदा भरली. जीएसटी, चाचणी शुल्क, रॉयल्टी आणि ७७.४६ लाख रुपये वास्तुविशारद शुल्कासह १६ कोटी ७१ लाख १८ हजार ४५२ रुपयांच्या खर्चाला स्थायी समितीने अंतिम मंजुरी दिली. करारानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असून सिंहस्थापूर्वी हा रस्ता पूर्ण करण्याचे नियोजन आहे. ----------------चौकट रस्ते विकासाला चालना म्हसरूळ व वरवंडी रोड हा महापालिकेचा बाह्य रिंग रोड आहे. अनेक वर्षांपासून या रस्त्याचा विकास आखाड्याला आहे. कुंभमेळ्याच्या निमित्ताने तीस मीटर रुंद रस्ता विकसित झाल्यानंतर ओझर विमानतळाकडे जाणे येणे सोपे होणार. त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात विकसित होत असलेल्या या भागात विकासाला अधिक चालना मिळणार आहे. ---------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com