नाशिक- नाशिकच्या ओझर विमानतळावरून देशांतर्गत सुरू असलेल्या विमानसेवत सात जून हा दिवस विशेष नोंद करणारा ठरला. या दिवशी पाच शहरांमध्ये तब्बल एक हजार ३३४ प्रवाशांनी प्रवास केल्याची नोंद झाली आहे. नाशिकच्या हवाई क्षेत्राच्या इतिहासात सर्वाधिक प्रवाशांची नोंद ठरली आहे.