Fire
sakal
नाशिक
Ozar News : प्रशासकीय दुर्लक्ष नडले! नोटिसा देऊनही सुरू असलेल्या अवैध भंगार दुकानाला आग, नागरिक संतप्त
Major Fire Breaks Out at Scrap Shop in Janori Near Ozar : पहाटेच्या सुमारास भंगार व पुठ्ठा बॉक्सच्या दुकानाला लागलेल्या भीषण आगीत दुकानातील साहित्य खाक झाले. या दुर्घटनेत अंदाजे १० ते १५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
ओझर: दिंडोरी तालुक्यातील जानोरी शिवारात सोमवारी (ता. ५) पहाटेच्या सुमारास भंगार व पुठ्ठा बॉक्सच्या दुकानाला लागलेल्या भीषण आगीत दुकानातील साहित्य खाक झाले. या दुर्घटनेत अंदाजे १० ते १५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
