ओझर- ओझर नगर परिषद हद्दीतील थकीत करवसुली मोहिमेला वेग आला असून, मार्च जवळ येत असल्याने वसुलीची जोरदार मोहीम सुरू झाली आहे. नगर परिषदेतर्फे वर्षभर सेवा देऊनही अनेक नागरिक कर भरण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी ‘अॅक्शन मोड’ वर आले आहे. थकबाकीदारांची नळजोडणी तोडण्याची कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी मार्च अखेरपर्यंत आपल्या थकीत व चालू घरपट्टी, पाणीपट्टी व व्यावसायिक कराची रक्कम वेळेत भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.