Nylon Manja
sakal
ओझर: येथील नगर परिषद व ओझर पोलिस ठाण्यातर्फे ओझर शहरात नायलॉन मांजा जप्ती व जनजागृती मोहीम राबविण्यात आली. या वेळी शहरातील दुकानांची झाडाझडती सुरू केली आहे. ही मोहीम ओझरच्या नगराध्यक्षा अनिता घेगडमल, मुख्याधिकारी किरण देशमुख तसेच ओझरचे पोलिस निरीक्षक नितीन कंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.