फोटो सिंगल
OZM26B14777
ओझर ः ''जय मल्हार ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या वार्षिक सभेप्रसंगी गुणवंतांचा सत्कार करताना अध्यक्षा लताताई टर्ले
--------------------
ज्येष्ठ नागरिक संस्थेची
ओझरला वार्षिक सभा
विविध उपक्रमांसह गुणवंतांचा सत्कार
सकाळ वृत्तसेवा
ओझर, ता.२ ः येथील जय मल्हार ज्येष्ठ नागरिक संस्थेची अकरावी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या कार्यालयात झाली. जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून संस्थेचा वार्षिक लेखाजोखा सादर करण्यात आला. वर्षभरात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
उपाध्यक्ष दिनकर वाकचौरे यांनी प्रास्ताविकात संस्थेचे आगामी कार्यक्रम आणि खर्च कमी करण्याच्या विविध उपायांवर मार्गदर्शन केले. उपस्थितांना ''जागतिक ज्येष्ठ नागरिक दिना''च्या शुभेच्छा दिल्या. सचिव सूर्यभान ठाकरे यांच्यासूचनेनुसार धर्मराज अहिरे यांनी अनुमोदन दिल्याने संस्थेच्या अध्यक्षा लताताई टर्ले यांच्या अध्यक्षतेखाली कामकाज सुरू झाले.
सर्वप्रथम वाढदिवस असलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. वसंत पेठकर यांनी सर्व सभासदांना फळवाटप केले. वर्षभरात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल तुकाराम गावडे, गंगाधर बोरसे आणि माणिकराव थोरात यांचा विशेष गौरव करण्यात आला. संस्थेचे सचिव सूर्यभान ठाकरे यांनी वार्षिक अहवाल सभासदांपुढे मांडला.
सभेला खजिनदार कुमुदिनी महाडिक, सदस्य माणिक थोरात, भीमराव मंडलिक, पार्वताताई शिंदे, उषाताई पराड, समन्वय समिती सदस्य ओमप्रकाश चौरे, जयश्री जंजाळे यांच्यासह हरिभाऊ मोरे, श्री. कदम, श्री. सोनवणे, श्री. वाटाणे आदी उपस्थित होते. धर्मराज अहिरे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.
----------------