ओझरखेड धरण सांडव्याजवळ थार-कारची धडक; एक ठार, सहा जखमी

ओझरखेड धरण सांडव्याजवळ थार-कारची धडक; एक ठार, सहा जखमी
Published on: 
13542 ओझरखेड : अपघातग्रस्त कार ओझरखेड धरण सांडव्याजवळ भीषण अपघात एक ठार, सहा जखमी; वाहनांचे मोठे नुकसान सकाळ वृत्तसेवा वणी, ता. १८ : वणी - नाशिक मार्गावरील ओझरखेड धरणाच्या सांडव्याजवळील वळणावर थार आणि एर्टिगा कारची भीषण धडक होऊन झालेल्या अपघातात कारचालकाचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले. मंगळवारी (ता. १७) रात्री साडेदहाच्या सुमारास हा अपघात झाला. कार (एमएच १५ जेएच ८८८२) ही नाशिकच्या दिशेने, तर कार (एमएच १५ केयू १२०५) वणीच्या दिशेने जात होती. ओझरखेड सांडव्याच्या पुढे दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की दोन्ही वाहनांच्या पुढील भागांचा चक्काचूर झाला. तसेच दोन्ही वाहने रस्त्यावर उलटली. या अपघातात कारचालक सुनील अरुण शिंदे यांचा मृत्यू झाला. कारमधील अजय गोविंदा पाटील, दिनेश मगन पाटील (वय ३२), काजल दिनेश पाटील (वय २८), भावेश पाटील, शिवसागर शिंदे आणि यश पाटील हे सहा जण जखमी झाले. मृत व जखमी सर्वजण यावल हल्ली, सुरत येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने मदतकार्य करीत जखमींना दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. घटनेची माहिती मिळताच वणी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक हेमंत फड यांनी पोलिस पथकासह घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. अपघातप्रकरणी रात्री उशिरा पर्यंत फिर्याद दाखल करण्याचे काम सुरु होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.