नाशिक- शहराचा वेगाने होत असलेला विस्तार आणि गगनचुंबी इमारतींची वाढती संख्या लक्षात घेता, ओझर विमानतळावरून उड्डाण करणाऱ्या विमानांच्या सुरक्षेच्या दृष्टीने या इमारती अडथळा ठरू शकतात, असा अंदाज हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) कंपनीने व्यक्त केला आहे. त्यामुळे विमानतळाच्या धावपट्टीपासून २० किलोमीटरच्या परिघात इमारतींच्या बांधकामास परवानगी देण्यापूर्वी एचएएलचा अभिप्राय घेणे अनिवार्य करावे, असे पत्र त्यांनी महापालिकेला सादर केले आहे.