ओझर: राज्यात गुटखा व पानमसाल्याची विक्री प्रतिबंधित असतानाही त्याची अवैध वाहतूक सुरूच आहे. अशाच प्रकारे मालट्रकद्वारे मध्य प्रदेशातून आणलेला गुटखा–पानमसाला ओझर येथील दहावा मैल येथे अन्न व औषध प्रशासन (म. रा.) विभागाने पकडला. या कारवाईत ८२ लाख ८७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.