ओझरमध्ये १ नोव्हेंबरपासून होलसेल फटाका मार्केट

ओझरमध्ये १ नोव्हेंबरपासून होलसेल फटाका मार्केट
Published on: 
ओझरमध्ये एक नोव्हेंबरपासून होलसेल फटाका मार्केट विक्रेत्यांना ना हरकत प्रमाणपत्रासाठी शनिवारपर्यंत मुदत सकाळ वृत्तसेवा ओझर, ता. २१ : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ओझर येथे यंदाही खंडेराव महाराज मंदिराजवळील यात्रा मैदानात होलसेल फटाका मार्केट सुरू होणार आहे. १ नोव्हेंबरपासून फटाका विक्रीला सुरुवात होणार असून, फटाका विक्रेत्यांना ना हरकत प्रमाणपत्रासाठी ओझर नगर परिषदेने २४ ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली आहे. त्यामुळे फटाका विक्रेत्यांकडून स्टॉल उभारणीची तयारी सुरू झाली आहे. ओझरमधील फटाक्यांची दुकाने एकाच ठिकाणी उभारण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्याने ग्राहकांसाठी खरेदी करणे अधिक सोयीचे होणार आहे. मागील गेल्या १५ वर्षांपासून ग्रामदैवत श्री खंडेराव महाराज मंदिराजवळील यात्रा मैदानात फटाका स्टॉल्स उभारण्यात येत आहेत. यंदाही याच ठिकाणी नियोजनबद्ध पद्धतीने मार्केट भरविण्यात येणार आहे. आतापर्यंत परवान्यासाठी २५ अर्ज प्राप्त झाल्याची माहिती ओझर फाटक असोसिएशनचे अध्यक्ष सतीश भागवत यांच्याकडून देण्यात आली आहे. नगर परिषदेकडून स्टॉलधारकांना विद्युत दिवे, पाण्याची सुविधा तसेच सुरक्षेच्या दृष्टीने वाळूची व्यवस्था करून देण्यात येणार आहे. ---------- खंडेराव महाराज मंदिराजवळील यात्रा मैदानात फटाका स्टॉल्स उभारल्यामुळे याचा फटाका विक्रेत्यांना फायदा होणार असून, ग्राहकांनाही खरेदीसाठी सोयीचे ठरणार आहे. नगर परिषदेकडून आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. -यतीन कदम, जिल्हाध्यक्ष भाजप उत्तर महाराष्ट्र ओझरमध्ये स्वस्त दरात फटाके उपलब्ध होत असल्याने नाशिक जिल्ह्यातील ग्राहकांचा प्रतिसाद वाढत आहे. यंदाही होलसेल मार्केटला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा आहे. -मनिष मंडलिक, होलसेल फटाका व्यापारी फटाके फोडताना विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. ध्वनी व वायुप्रदूषण करणारे फटाके टाळावेत. सुरक्षिततेचे नियम पाळून दिवाळीचा आनंद घ्यावा. - महेश कुलकर्णी, पोलिस निरीक्षक, ओझर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com