चाळीसगाव येथे मंजुळ स्वरांनी रंगला दिवाळी पाडवा पहाट कार्यकम

चाळीसगाव येथे मंजुळ स्वरांनी रंगला दिवाळी पाडवा पहाट कार्यकम
Published on: 
CSG26B03090 चाळीसगाव : वाणी मंगल कार्यालयात ‘पाडवा पहाट’ कार्यक्रमप्रसंगी संगीतकारासह योगेश भोकरे व सेवाभावी ट्रस्टचे सदस्य. ---------------- मंजुळ स्वरांनी रंगला ‘पाडवा पहाट’ -------------------- चाळीसगावकरांची दाद; लाडशाखीय वाणी समाज सेवाभावी ट्रस्टचा उपक्रम सकाळ वृत्तसेवा चाळीसगाव, ता. ७ : ‘पाऊले चालती पंढरीची वाट, सुखी संसाराची तोडुनिया गाठ’, ‘मन लागो रे माझे गुरूच्या चरणी’ यांसह विविध भक्तिगितांच्या स्वररसात रसिक चिंब न्हाहले. निमित्त होते चाळीसगाव येथील लाडशाखीय वाणी समाजाच्या सेवाभावी चॅरिटेबल ट्रस्टच्या ‘पाडवा पहाट’ कार्यक्रमाचं. येथील भडगाव रोडस्थित वाणी समाज मंडळाच्या कार्यालयात शुक्रवारी (ता.६) हा कार्यक्रम सकाळी सहाला झाला. या कार्यक्रमात संगीतकार गौरव काळंगे, पार्श्वगायिका रक्षा काळंगे, सहकलाकार धीरज जगताप (पुणे) हे सहभागी होते. त्यात त्यांनी त्यांच्या सुमधुर वाणीने रसिकांची मने जिंकली. भावगीत व भक्तिगीतांच्या मैफिलिने पहाटेच श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. एकापेक्षा एक सरस गीतांनी पाडव्याची पहाट संसमरणीय ठरली. उपस्थितांना लकी ड्राच्या माध्यमातून विजेत्यांना आकर्षक भेटवस्तू मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. सेवाभावी ट्रस्टचे अध्यक्ष योगेश भोकरे यांनी ‘पाडवा पहाट’चे महत्व समाजबांधवाना पटवून दिले. सूत्रसंचालन कैलास पाखले यांनी केले. सकाळी सहाला सुरू झालेल्या कार्यक्रमाची सांगता आठला झाली. लाडशाखीय वाणी समाज सेवाभावी ट्रस्टचे अध्यक्ष भोकरे, उपाध्यक्ष भालचंद्र वाणी, सचिव विजय भामरे, सहसचिव कैलास पाखले, सदस्य भालचंद्र सोनगिरे, दिलीप येवले, जयवंत कोतकर, प्रा. बी. आर. येवले, प्रकाश अमृतकार, केशव गोल्हार, अनिल कोतकर, सतीश देव, गजानन कोतकर, अशोक गोल्हार, हिरालाल शिनकर, मनोज शिरुडे, प्रशांत बागड, त्र्यंबक बागड, डॉ. संतोष मालपुरे, श्रीधर फुलदेवरे, पुरुषोत्तम ब्राह्मणकार, हरिचंद्र पिंगळे, मयूर अमृतकार यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.