Painting Theft Case : नाशिक कलानिकेतन चित्रचौर्याचा तीव्र निषेध

Exhibition of stolen paintings in Jahangir Art Gallery.
Exhibition of stolen paintings in Jahangir Art Gallery.esakal

नाशिक : कलानिकेतनच्या चित्रकला महाविद्यालयातील विजेती व मौल्यवान चित्रे कचऱ्याबरोबर नेऊन त्यावर स्वतःचे नाव टाकून मुंबईच्या जहाँगीर आर्ट गॅलरीत प्रदर्शन भरविणाऱ्या योगेश वालदेच्या या चित्रचौर्यामुळे चित्रकार, कलाकार यांच्यामध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.

या घडलेल्या चित्रचौर्य प्रकरणामुळे समाज माध्यमातून तीव्र नापसंती व्यक्त होत आहे. कला जगतातून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येत असून, काही कलाकांरानी गुन्हा दाखल करण्याची मागणी केलेली आहे. (Painting Theft Case Nashik Kala Niketan Painting Theft Strongly Condemned Nashik Latest Marathi News)

मुंबईमध्ये जहाँगीर आर्ट गॅलरीमध्ये निसर्गचित्रांचे प्रदर्शन, अशी जाहिरात करून योगेश वालदे यांनी फिगर ड्रॉइंगचे प्रदर्शन भरवले. श्री. वालदे याने नाशिक कलानिकेतनच्या चित्रकला महाविद्यालय इमारतीचे रंगकाम करण्याचे काम घेतले होते. आतून व बाहेरून साफसफाई करून रंगकाम करताना कचऱ्याबरोबरच वालदे यांनी मौल्यवान चित्रही नेली, असे प्राचार्य अनिल अभंगे यांचे म्हणणे आहे.

सुमारे सहा ते सात छोटा हत्ती टेम्पो कचरा व कॅनव्हास चित्रांच्या गुंडाळी त्यांनी नेल्याचे समजते. किमती व पारितोषिकविजेती चित्रे कचऱ्यात घालून नेण्याचे काम वालदे यांनी रात्री उशिरा आणि सकाळी लवकर केलेले आहे. त्यावेळी संस्थेची कोणीही जबाबदार व्यक्ती उपस्थित नव्हती.

कोरोनाकाळ व लॉकडाउन असल्यामुळे महाविद्यालय बंद होते. तेथे फक्त प्राचार्य आणि दोन कर्मचारीच असत. प्राध्यापक, विद्यार्थी कोणीही त्या काळात कॉलेजमध्ये येत नव्हते. वालदे याने निसर्गचित्राचे प्रदर्शन आहे, असे सांगून व तशा कलाकृती दाखवून आर्ट गॅलरी मिळविली होती. मात्र फिगर ड्रॉइंगचे चित्र प्रदर्शन भरवलेले होते. तसेच त्याच्या निमंत्रण पत्रिकेवर व पोस्टरवरही विमल वर्मा यांच्या चित्राचा उपयोग करून स्वतःचे नाव टाकले होते.

महाविद्यालयाचे प्राचार्य अभंगे यांनी दिलेल्या निवेदनात ते म्हणत आहेत, की आपल्या या कलाक्षेत्रात अत्यंत वाईट व निंदनीय आणि संतापजनक घटना घडलेली आहे. वालदे यांनी भरवलेल्या चित्रप्रदर्शनात असे निदर्शनास आले, की त्यांनी गॅलरीत लावलेली सर्व चित्रे नाशिक कलानिकेतन नाशिकच्या प्रत्यक्ष निसर्गचित्र स्पर्धेतील आहेत.

त्याला विचारणा केली असता, कॉलेजमधून सर तुम्हीच मला कचरा नेण्यास सांगितला होता. त्यातून ही चित्रे मला मिळालेली असल्याचे स्पष्टीकरण दिले. रंगकाम करताना फक्त खराब झालेली, तुटलेली, वाळवी लागलेली, फाटलेली खराब झालेली चित्रे नेण्यास सांगितले होते. एका वर्गात खराब एका बाजूला व चांगली चित्रे एका बाजूला करून रॅकमध्ये ठेवली होती.

खराब वस्तू, कचरा, खराब चित्रे नेण्याचे कामही योगेश वालदे यांच्याकडे दिलेले होते, असा खुलासा प्राचार्यांनी केला. वालदे व त्याचे कामगार हे सकाळी लवकर किंवा रात्री रहदारी कमी झाल्यानंतर रिक्षातून कचरा नेत होते. त्या खराब चित्रांबरोबरच निवडलेली चांगली चित्रे ही वालदे हा घेऊन गेला. ही बाब आमच्या लक्षात आली नाही.

Exhibition of stolen paintings in Jahangir Art Gallery.
Dinesh Bagul Bribe Case : ‘वरदहस्ता’ मुळे बागूल ‘आदिवासी’त मोकाट

कारण कॉलेजमध्ये ट्रॅकवर अन्य चित्रे, फ्रेमिंग, स्ट्रेचर त्याचबरोबर निवडलेली चित्रे असल्यामुळे निवडक चित्रे कधी गायब झाली ते आम्हाला कळाले नाही. सर्व विद्यार्थ्यांना वालदे सांगत आहेत, की मलाही सर्व चित्रे प्राचार्य अभंगे यांनी दिली आहेत. तो धादांत खोटे सांगून मला व संस्थेला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहे. या संबंधित व्यक्तीविरोधात कायदेशीर मार्गाचा आम्ही अवलंब करणार असल्याचे प्राचार्य अनिल अभंगे यांनी सांगितले.

"कचऱ्यामध्ये मौल्यवान चित्र नेणाऱ्यांची कसून चौकशी करीत आहोत. दोषींवर दोन दिवसांत कारवाई केली जाईल. जहाँगीर आर्ट गॅलरीमध्ये ज्यावेळेस हा प्रकार उघडकीस आला त्या वेळी मी स्वतः तेथे उपस्थित होतो. आम्ही दुसऱ्या प्रदर्शनासाठी गेले होतो. हा प्रकार लक्षात येताच आम्ही प्रदर्शन बंद करण्यास सांगितले. अशा चित्रचौर्यामुळे नाशिकचा एक चित्रकार ब्लॅंकलिस्टमध्ये गेला आहे. आजच पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन दोषींवर कारवाई केली जाईल."

- रघुनाथ कुलकर्णी, अध्यक्ष, नाशिक कलानिकेतन

"‘सकाळ’च्या पहिल्या पानावरील बातमी वाचून अक्षरशः धक्का बसला. संस्थेच्या कामकाजावर कोणाचाही अंकुश राहिला नसल्याचे सिद्ध झालं आहे. पदाधिकारी व संस्थाचालकांचे दुर्लक्ष हेच याला कारणीभूत आहे. ज्येष्ठ चित्रकार स्वर्गीय वा. गो. कुलकर्णी यांनी स्थापन केलेले या संस्थेतील हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे. ‘आंधळं दळतं आणि कुत्रं पीठ खातं, अशी ही अवस्था संस्थेत सध्या चालू आहे." -आनंद सोनार, ज्येष्ठ चित्रकार

Exhibition of stolen paintings in Jahangir Art Gallery.
पाण्यासाठी घोटीकरांची वणवण; पाणीपुरवठा योजनेला मंत्रालयीन निर्णयाची प्रतिक्षा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com