येवला- पारंपरिक पैठणी निर्मितीमध्ये अग्रस्थानी असलेल्या येवला व पैठण या ठिकाणांना शासनाने भौगोलिक उपदर्शन (जीआय) मानांकन दिले असतानाही, मुंबई येथील विणकर सेवा केंद्राकडून वैजापूर येथील काही संस्थांना प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. या कृतीमुळे स्थानिक विणकरांत तीव्र नाराजी व्यक्त होत असून, ही परंपरागत कलेचा अवमान करणारी आणि जीआय नामांकनाचा अनादर करणारी कृती असल्याचा आरोप करण्यात आला आहे.