लाखोंच्या पैठणींवर चोरट्यांचा डल्ला; नाशिक हायवेवरील शोरूम फोडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

paithani sarees worth lakhs of rupees were stolen from the showroom

लाखोंच्या पैठणींवर चोरट्यांचा डल्ला; नाशिक हायवेवरील शोरूम फोडले

येवला (जि. नाशिक) : चोरी करताना चोरट्यांची फक्त रोकड अन्‌ सोन्यावरच नजर असते. पण, आता चोरही बदलले असून, येथील एक पैठणीचे शोरूम फोडून चोरट्यांनी लाखो रुपयांच्या पैठणीवर डल्ला मारला आहे.

मागील दोन आठवड्यांपूर्वी कोटमगाव शिवारातील सई पैठणीचे दुकान चोरट्यांनी फोडल्याची घटना ताजी असताना चोरट्यांनी राजमाता पैठणीचे शोरूम पडल्याने पैठणी विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बुधवारी (ता. १८) पहाटे दोनच्या सुमारास येवला शहरातलगत अंगणगाव शिवारात नाशिक - औरंगाबाद महामार्गावर राजमाता येवला पैठणी या शोरूमच्या दुकानाच्या मागील बाजूचा पत्रा कापून शो रूममध्ये प्रवेश केला. दुकानातील लाखो रुपयांच्या महागड्या पैठण्या गल्लीतील रोख रक्कम अंदाजे दहा हजार रुपये ऐवज चोरून नेला. या घटनेचा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. शहर पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संदीप कोळी त्यांनी घटनास्थळी धाव घेत कसून चौकशी केली.

या वेळी राजेंद्र पाटील, गणेश पवार, सतीश बागूल, गणेश आव्हाड आदींनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. दरम्यान, या दुकानातील अंदाजे तीन ते चार लाखांच्या पैठण्यांची, गल्यातील अंदाजे दहा हजार रुपयांची चोरी झाल्याची माहिती दुकान मालक उमेश बोरणारे यांनी दिली.

हेही वाचा: नाशिक : द्वारका ते नाशिकरोड थेट उड्डाणपूल; नितीन गडकरींची घोषणा

हेही वाचा: नाशिक : टोलनाक्यावर तृतीयपंथी- वाहन चालकांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी

टॅग्स :Nashik