(कृपया आवश्यक/फोटोसह घ्यावी हि विनंती.)
फोटो-27345
नाशिक : पालखेड डाव्या कालव्याला पाणी सोडण्याच्या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देताना आमदार किशोर दराडे व पदाधिकारी.
पालखेड डाव्या कालव्यातून पाणी सोडा..!
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमदार किशोर दराडे यांचे साकडे
सकाळ वृत्तसेवा
येवला, ता. २७ : तालुक्यातील पश्चिम व उत्तर भागात पिकांची परिस्थिती गंभीर असून, उभी पिके वाचविण्यासाठी पालखेड डाव्या कालव्यातून तातडीने आवर्तन सोडावे, अशी मागणी आमदार किशोर दराडे यांनी केली. नाशिक येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देत त्यांना साकडे घातले.
तालुक्यातील टंचाई बिकट असून, पाण्याअभावी पिकांची परिस्थिती गंभीर आहे. त्यातच धरणात पाणी असल्याने पालखेड डाव्या कालव्यातून शेतीसाठी आवर्तन देण्याच्या मागणीसाठी आमदार दराडे यांनी साकडे घातले.
तालुक्याच्या पश्चिम भागासह उत्तर भागातील काही क्षेत्रांत पावसाअभावी पिकांचे नुकसान झाले आहे. मका, सोयाबीन तसेच अन्य पिके पाण्याअभावी वाया जाण्याची भीती असून, शेतकऱ्यांनी बियाणे, खते, औषधे आणि मजुरीवर खर्च केला आहे. गरजेच्या वेळी पाणी उपलब्ध न झाल्यास त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरणार आहे. त्यामुळे पालखेड डाव्या कालव्याचे पाणी मिळणे आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
पालखेड डाव्या कालव्याच्या पाण्याचे योग्य नियोजन केल्यास उभी पिके वाचण्यास मदत होईल. यासाठी उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेऊन पाणीवाटपाचे नियोजन करावे, सिंचनाची तांत्रिक शक्यता तपासावी आणि संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे.
वेळेत आवर्तन दिल्यास येवला शहरास इतर ठिकाणी देखील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे. त्यामुळे उशीर न करता नंबर मध्येच आवर्तन द्यावे, अशी मागणी आमदार दराडे यांनी केली. तालुकाप्रमुख पांडुरंग शेळके, शहरप्रमुख विशाल परदेशी, मर्चंट बँकेचे उपाध्यक्ष सुभाष गांगुर्डे आदी उपस्थित होते.
.........
कोट
धरणात पुरेसे पाणी आहे. त्यातच पिके पाण्याअभावी वाया जाऊन लाखो रुपयांचे नुकसान होणार आहे. पाण्याची उपलब्धता असल्याने व शेतीसह पिण्यासाठीही पाण्याची गरज असल्याने पालखेडचे आवर्तन देण्याची मागणी आम्ही केली असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक सूचना केल्या आहेत.
- किशोर दराडे, आमदार