विविध मागण्यासाठी आदीवासी सेनेचे पालखेड ग्रामपंचायतीला निवेदन

विविध मागण्यासाठी आदीवासी सेनेचे पालखेड ग्रामपंचायतीला निवेदन
Published on: 
मेनशेजारी घेणे... फोटो-10313 पालखेड मिरचीचे (ता. निफाड) ः आदिवासी सेनेतर्फे ग्रामपंचायतीला विविध मागण्यांचे निवेदन देताना आकाश कराटे व महिला. पालखेड ग्रामपंचायतीला आदिवासी सेनेचे निवेदन सकाळ वृत्तसेवा पिंपळगाव बसवंत, ता. ६ ः पालखेड मिरचीचे (ता. निफाड) राघोजी भांगरे स्मारक उभारा, वेशीतील व इंदिरानगर येथे रस्त्याचे क्राँक्रिटीकरण करा, चिकन मार्केट उभारा, इंदिरानगरमध्ये मुबलक पाणीपुरवठा करा आदींसह विविध मागण्यांसाठी आदिवासी शक्ती सेनेने पालखेड ग्रामपंचायतीला निवेदन दिले. मागण्यांबाबत सकारात्मक पावले न उचलल्यास उपोषणाचा इशारा देण्यात आला. आदिवासी शक्ती सेनेचे निफाड तालुका युवाध्यक्ष आकाश कराटे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले. निवेदनाचा आशय असा ः छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, खंडेराव मंदिर संरक्षण भिंत, पेव्हर ब्लॉक, रानवड रस्त्यावर सभामंडप, उद्यान उभारणे, पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करणे, शौचालय बांधणे, इंदिरानगर व मातंगवाडा येथे जलकुंभ उभारणे, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका उभारणे आदी विषयांची तत्काळ पूर्तता करावी. ग्रामविकास अधिकारी तानाजी कुशारे यांना निवेदन देण्यात आले. मागण्यांबाबत विचार न केल्यास तीव्र उपोषणाचा इशारा देण्यात आला. निवेदन देताना समाधान कोकाटे, गोरख बेंडकुळे, नवनाथ कराटे, मंदाबाई चारोस्कर, मंदाबाई धामोडे, शीला गांगुर्डे, रेखा कोकाटे, शीतल कोकाटे, योगिता कोकाटे, मनीषा कोकाटे, पूजा गायकवाड, सुनीता कोकाटे, कांचन चारोस्कर, मनीषा चारोस्कर, मुक्ता कडाळे, संगीता कडाळे, संगीता शिंदे, गायत्री कराटे, सुरेखा कराटे, भारती कोकाटे, कमल शिंदे, कमल भोई, विमल शिंदे, चित्रा कराटे, पुंजाबाई शिंदे आदी उपस्थित होते. -----------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.