नाशिक रोड- नाशिक-पुणे महामार्गावरील पळसे गावाकडे जाणारा मुख्य रस्ता अनेक वर्षांपासून शिवनाल्यावरून जात असून, या मार्गावर ब्रिटिश कालखंडातील सुमारे शंभर वर्षांपूर्वी बांधलेला दगडी पूल अद्याप वापरात आहे. मात्र, पुल जुना झाल्याने व दीर्घकाळापासून दुरुस्ती न झाल्यामुळे तो सध्या पूर्णपणे जीर्णावस्थेत असून, वाहतुकीस अत्यंत धोकादायक ठरतो आहे. पावसाळ्यात कोणत्याही क्षणी पूल कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.