Nashik News: पाणंद रस्त्यांना आता ग्रामीण मार्गाचा दर्जा; ग्रामविकास विभागाचा निर्णय

rural development
rural developmentesakal

Nashik News : शेतीमधील पाणंद रस्त्यांना ग्रामीण मार्गात रूपांतर करण्यासाठी सकारात्मक विचार करण्याचे संकेत देत, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ग्रामविकास विभाग यांनी समन्वयाने कार्यवाही करून राज्यातील पाणंद रस्त्यांना ग्रामीण मार्गात रूपांतर करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. (Panand Roads Now Rural Route Status Decision of Rural Development Department Nashik News)

यामुळे या रस्त्यांना शासनस्तरावरून विविध लेखाशिर्षकाखाली निधी मिळण्यातील अडचणी दूर होणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील पाणंद रस्त्यांच्या कामांना आता गती येणार आहे.

शेतामध्ये जाण्यासाठी पाणंद रस्त्यांचा वापर केला जातो. पूर्वी हे रस्ते अतिशय छोटे होते. काळ बदलेल तसे शेतीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान येऊ लागले. वाहनांची संख्या वाढू लागली. ही वाहने शेतापर्यंत नेण्यासाठी पाणंद रस्त्यांसाठी शासनाच्या वतीने खास योजना आखली होती.

सन २०१८ मध्ये शासनाने पाणंद रस्ते चांगले करण्यासाठी रस्त्यांची वर्गवारी करण्याचे आदेश दिले होते. पाणंद रस्ते निश्चित करून त्यांच्या कामांना प्राधान्य देण्याबाबत सांगण्यात आले. पाणंद रस्त्यांची कामे विशेषतः रोजगार हमी योजनेतून अधिक प्रमाणात करण्याचा प्रयत्न केला जातो.

पाणंद रस्त्यांना जिल्हा, राज्य मार्गाचा दर्जा नसल्याकारणाने शासनाचा निधी देण्यात मोठया अडचणी येत होत्या. नवीन रस्ते, दुरुस्त्यांसाठी निधी नसल्याने या रस्त्यांची संपूर्ण दुरवस्था झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून या रस्त्यांच्या कामांसाठी निधीची मागणी होत होती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

rural development
Nashik News: गोंदे ते पिंपरीसदो रस्त्याचे होणार 'व्हाइट टॉपिंग'द्वारे सहापदरीकरण

आमदारांकडूनही वेळोवेळी या रस्त्यांसाठी निधीची मागणी केली होती. शासनस्तरावरून पाणंद रस्त्यांना निधी देण्यासाठी मात्र अडचणी होत्या. शेत, पाणंद रस्त्यांना ग्रामीण मार्गाचा दर्जा नसल्यामुळे रस्ते व त्यावर पूल बांधण्यासाठी शासकीय योजनेमधून इच्छा असूनही निधी देणे शक्य होत नव्हते.

त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती करता येत नसल्याने शेतमालाची वाहतूक करणे अशक्य होऊ लागले आहे. त्यामुळे पाणंद रस्त्यांना ग्रामीण मार्गाचा दर्जा देण्याबाबत शासनाकडून विचार सुरू होता.

त्यातून शासनाने ग्रामीण मार्गाचा दर्जा पाणंद रस्त्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील पाणंद रस्त्यांबाबत सविस्तर अहवाल आठ दिवसात पाठविण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना देण्यात आल्या आहेत.

"पाणंद रस्त्यांना कोणताही दर्जा नसल्याने शासनाकडून निधी मिळविण्यात अडचणी येत होत्या. मात्र, राज्य शासनाने या रस्त्यांना ग्रामीण मार्गाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतल्याने ग्रामीण भागातील रस्त्यांना झळाळी मिळणार आहे. वाहतूक दळवणवळणाचा सुविधा वाढण्यास मदत मिळणार आहे." - डॉ . आत्माराम कुंभार्डे, माजी गटनेता, भाजप, जिल्हा परिषद

rural development
Bank Election: 21 जागांसाठी विक्रमी 160 अर्ज दाखल; छाननीनंतर मंगळवारी नामनिर्देशन पत्रांची सूची प्रसिद्ध होणार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com