
वणी (जि. नाशिक) : आद्यस्वयंभु शक्तीपीठ श्री भगवती श्री सप्तशृंगी मातेच्या दैनंदिन पुजाअर्चा आणि विधी मध्ये मागील अनेक वर्षापासुन सुरू असलेल्या पंचामृत अभिषेक संदर्भिय प्रक्रियेत बदल करण्यात आले असून दैनिक स्वरूपात श्री भगवती स्वरूपावर पाणी, दुध, लोणी, मध, साखर, नारळपाणी तसेच तुपाचा वापर करता येणार नसुन पर्यायी व्यवस्था म्हणुन देणगीदार भाविकांच्या योगदानातुन श्री भगवतीची साधारण २५ किलो चांदी धातुची उत्सव मूर्ती तयार करण्यात आली असुन, त्यावर पंचामृत महापुजा विधिवतपणे करण्यात येणार असल्याचे नियोजन विश्वस्त संस्था व पुजारी वर्गाच्या मार्गदर्शनानुसार निश्चित करण्यात आले असल्याचे माहिती ट्रस्टच्यावतीने प्रसिध्द पत्रकाद्वारे केली आहे. (Panchamrit Abhishek Puja of Saptshringi Mata will performed on an alternative idol instead of original Nashik Latest Marathi News)
श्री भगवतीचे स्वरूप हे हजारो वर्षापासुन असुन, लाखोच्या संख्याने भाविक दरवर्षी श्री भगवतीच्या चरणी नतमस्तक होतात. भाविकांची श्रध्दा आणि आस्था विचारात घेता श्री सप्तशृंग निवासीनी देवी ट्रस्ट वर्षे १९५५ पासुन कार्यरत असून, भाविक वर्गाच्या विविधांनी सेवा-सुविधा देण्यास प्रयत्नशील आहे.
भाविकांची श्रध्दा व धार्मिक आवश्यकता विचारात घेता वर्षे २०१४ पासुन श्री भगवती स्वरूप / मुर्ती संवर्धन बाबत सुरू असलेली व केलेली चर्चा आणि झालेली विविध ठराव तसेच नियोजनाचा विचार करता भारतीय पुरातत्व व आय. आय. टी. पवई यांनी दिलेले तज्ञ मार्गदर्शनाप्रमाणे सर्व प्रथम श्री भगवती मंदिराच्या वरील डोंगराचा परिसराचा तांत्रिक निरिक्षण आणि त्याबाबतच्या उपाययोजना करून श्री भगवती स्वरूपाच्या प्रत्यक्ष संवर्धन व देखभाल प्रक्रियेची सुरूवात मा. जिल्हाधिकारी साहेब यांच्या पूर्व परवानगीने व काटेकोर नियोजन करून भारतीय पुरातत्व विभागाकडील नोंदणीकृत संस्था मे अजिंक्यतारा कन्सलटन्स, नाशिक यांच्या मार्फत व सेवानिवृत्त अधिक्षक डॉ. सिंग यांच्या तज्ञ मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
प्रसंगी सदर प्रक्रियेच्या यशस्वीतेसाठी विशेष समिती स्थापन करून त्यात विश्वस्त मंडळ प्रतिनिधी, कायदेशीर तज्ञ, पुरोहित प्रतिनिधी, तांत्रिक तज्ञ, शासकीय प्रतिनिधी, ग्रामपालिका प्रतिनिधी स्थानिक प्रतिनिधी, उपसमिती प्रतिनिधी व इतर १३ व्यक्तींच्या सहभागातून मा. अध्यक्ष श्री सप्तशृंग निवासीनी देवी ट्रस्ट, सप्तशृंगगड यांच्यासह धार्मिक मार्गदर्शन प्राप्त करून विधिवत पुजाअर्चा आणि यज्ञाचे आयोजन करून दि. २०/०७/२०२२ ते दि. ०८/०९/२०२२ दरम्यान मुर्तीचे संवर्धन करण्यात आले असुन, श्री भगवतीवरील शेंदुर (कवच ) काढण्यात येवुन श्री भगवतीची अत्यंत प्राचीन व मुळ तेजोमय स्वरूप श्री भगवती मुर्तीस प्राप्त झाले आहे. त्यामुळे सदर तेजोमय भगवतीचे स्वरूपाचे जसेच्या तसे जपवणुक व जतन करण्याची जबाबदारी विश्वस्त मंडळ, पुरोहित वर्ग तसेच स्थानिक गांवकरी, विश्वस्त संस्थेचे प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी व भाविक भक्तांची आहे.
सदर प्रक्रिया सुरू असतांना विश्वस्त संस्थेचे कर्मचारी, स्थानिक ग्रामस्थ व भाविकांना श्री भगवती दर्शन बंद करण्यात आले होते. श्री भगवती स्वरूप / मुर्ती संवर्धन संबंधीत कामकाजाची पुर्तता सुरू असतांना, आवश्यक ते नुसार धार्मिक मार्गदर्शन वेदाचार्ज श्री. गणेश्वरशास्त्री द्राविड, वाराणसी व स्मार्तचुडा श्री. शांताराम भानोसे, नाशिक, श्री. भालचंद्र शोचे, नाशिक व श्री. महंत सुधीरदास पुजारी, नाशिक यांच्यासह श्री भगवतीचे वंशपरंपरागत सप्तशृंगीगडावरील मानाचे पुजारी दिक्षित व देशमुख परिवार यांचे मौल्यवान मार्गदर्शन प्राप्त करून घेण्यात आले. तसेच आवश्यकतेनुसार धार्मिक व ऐतिहासिक संदर्भ देखील तपासण्यात आले व त्यावर सखोल विचार विनिमय करून धर्मचार्याचे मार्गदर्शनाप्रमाणे श्री भगवती स्वरूप व मुर्ती संवर्धनाबाबतचे नियोजन करण्यात आले.
श्री भगवती स्वरूप / मूर्ती संवर्धन व देखभाल प्रक्रिया दरम्यान श्री स्वरूपावरील शेंदुर काढल्यानंतर दैनिक स्वरूपात होणा-या पंचामृत अभिषेक पुजेच्या नियमात अर्थात सामग्री वापरावर काही प्रकारात बदल करण्यात आले असुन सदरचा बदल हा श्री भगवती स्वरूपाच्या निरंतर पुजेसाठी अत्यंत आवश्यक व जरूरीचा आहे. त्यामुळे दैनिक स्वरूपात श्री भगवती स्वरूपावर पाणी, दुध, लोणी, मध, साखर, नारळपाणी तसेच तुपाचा वापर करता येणार नसुन पर्यायी व्यवस्था म्हणुन देणगीदार भाविकांच्या योगदानातुन श्री भगवतीची साधारण २५ किलो चांदी धातुची उत्सव मूर्ती तयार करण्यात आली असुन, त्यावर पंचामृत महापुजा विधिवतपणे करण्यात येणार असल्याचे नियोजन विश्वस्त संस्था व पुजारी वर्गाच्या मार्गदर्शनानुसार निश्चित करण्यात आले आहे.
दि. २६/०९/२०२२ रोजी श्री भगवती मंदिर सर्व भाविक भक्तांना दर्शनासाठी खुले होणार असून, यापुढील सर्व पंचामृत महापुजा विधिवत पध्दतीने श्री भगवतीच्या उत्सव मूर्तीवरच होणार असून, याबाबत धार्मिक गुरू व स्थानिक पुजारी वर्गाने देखील सहमती दर्शवुन मार्गदर्शन दिले आहे. त्यामुळे सदर बदल विचारात घेवुन यापुढे भाविकांनी उत्सव मुर्तीवरील पुजेला प्राधान्य देणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे यापुढील विश्वस्त संस्था व पुजारी वर्गाने निर्धारित केलेले महत्वाचे सण उत्सव व मुहूर्त वगळता इतर सर्व दिवशी चांदीच्या उत्सव मुर्तीवरच श्री भगवतीची पंचामृत महापुजा नियोजित असेल यांची सर्व भाविक भक्तांनी नोंद घ्यावी ही विश्वस्त संस्थेकडुन नम्र विनंती आहे.
तरी सर्व भाविक भक्तांनी सदर पंचामृत महापुजा संबंधीत बदल विचारात घेवुन विश्वस्त संस्थेला योग्य ते सहकार्य दयावे असे नम्र विनंती विश्वस्त संस्था, पुजारी वर्ग, स्थानिक ग्रामस्थ तसेच विश्वस्त संस्थेच्या प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी यांचे वतीने करण्यात येत आहे. तसेच श्री भगवतीचे मुळ तेजोमय स्वरूपाचे जपवणुक व जतन करण्याची संपुर्ण जबाबदारी ही विश्वस्त संस्था, पुजारी वर्गाच्या वतीने सर्व भाविक भक्तांना केली आहे. त्यासाठी सर्व भाविक भक्तांनी योग्य ते सहकार्य श्री भगवतीचे मुळ स्वरूपाचे जतन करण्यासाठी करावे असे आवाहन विश्वस्त, संस्थेचे पुजारी वर्गाकडून करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.