Sandeep Gaikwad
sakal
पंचवटी: आईला रुग्णालयात घेऊन जाण्याच्या कारणावरून दोन भावांमध्ये झालेल्या वादाचे पर्यावसन थेट खुनात झाले. लहान्या भावाने रागाच्या भरात मोठ्या भावाच्या छाती व पोटात चाकूचे वार करून त्याची निर्घृण हत्या केल्याची हृदयद्रावक घटना बुधवार (ता. २१) रोजी दुपारी सुमारे तीन वाजता आडगाव शिवारात घडली.