म वि प्र कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय येथे जिल्हास्तरीय खो - खो मुलींच्या स्पर्धा उत्साहात संपन्न .

म वि प्र कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय येथे जिल्हास्तरीय खो - खो मुलींच्या स्पर्धा उत्साहात संपन्न .
Published on: 
14729 दिंडोरी : जिल्हास्तरीय खो खो स्पर्धेच्या उद्‌घाटनाप्रसंगी उपस्थित मान्यवर. पंचवटी महाविद्यालयास खो खो स्पर्धेचे विजेतेपद सकाळ वृत्तसेवा दिंडोरी, ता. २१ : येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात झालेल्या जिल्हास्तरीय आंतर महाविद्यालयीन खो खो स्पर्धेत (मुली) पंचवटी महाविद्यालयाने अंतिम सामन्यात चांदवड महाविद्यालयाचा पराभव करत विजेतेपद पटकावले. सोमवारी या स्पर्धा पार पडल्या. नाशिक जिल्ह्यातील १६ महाविद्यालयातील १७७ खेळाडू मुलींनी सहभाग नोंदवला होता. तत्पूर्वी सुजित मुरकुटे,प्रशांत पाटील,संतोष कथार, नाशिक क्रीडा समितीचे खजिनदार डॉ दिनेश कराड,उपसचिव राजाराम कारे, स्वप्नील कर्पे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्‌घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी मविप्र संचालक प्रवीण जाधव होते. प्राचार्य डॉ. प्रतिमा वाघ यांनी प्रास्तविक करत ग्रामीण भागातील विद्यार्थी यांनी खेळाच्या माध्यमातून आपला विकास साधून आपले शरीर स्वस्त आणि निरोगी बनवावे असे आवाहन केले. श्री. जाधव यांच्या हस्ते अंतिम सामन्यात नाणेफेक करण्यात आली. या पंचवटी संघाने चांदवड महाविद्यालयावर एकतर्फी १२ गुणांनी विजय मिळविला. तर चांदवड संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. या प्रसंगी उपप्राचार्य प्रा.आर.आर.झोमन, नॅक समन्वयक अनिरुद्ध भगत, प्रा.गौरव सोमवंशी, एस.के.पगार, प्रा.बंडू कोल्हे, प्रा.जगदीश गुरुळे, डॉ. राजेश कासार, डॉ.रवींद्र चव्हाण, प्रा.मोशीन शहा आदींसह विद्यार्थी उपस्थित होते.
Marathi News Esakal
www.esakal.com