Panchavati Express sakal
नाशिक
Panchavati Express : पंचवटी एक्स्प्रेसमध्ये सुरू होणार ‘एटीएम’
नाशिककरांची प्रवासवाहिनी असणाऱ्या मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेसमध्ये एटीएम सुरू करणार असल्याचे संकेत रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने नुकतेच दिले आहेत.
उपनगर- नाशिककरांची प्रवासवाहिनी असणाऱ्या मनमाड-मुंबई पंचवटी एक्स्प्रेसमध्ये एटीएम सुरू करणार असल्याचे संकेत रेल्वेच्या जनसंपर्क विभागाने नुकतेच दिले आहेत. पंचवटी एक्स्प्रेस जिल्ह्याच्या नागरिकांसाठी एका दिवसात मुंबईला जाण्यासाठी आणि येण्यासाठी सोयीची आहे. त्यामुळे प्रवाशांना दर्जात्मक आणि गुणात्मक सेवा पुरविण्यासाठी एटीएम सेवेचा विचार रेल्वेने केला असून, यासाठी संशोधन आणि विकास या तत्त्वावर चाचण्या सुरू आहेत.