Gangaghat excavation
sakal
पंचवटी: जुन्या भाजी बाजार पटांगणाजवळील भागात गंगाघाटाच्या रस्त्यालगत सध्या खोदकाम सुरू आहे. येथील खोदकाम खडक फोडून करण्यात येत आहे. हे खोदकाम करताना या भागात अनेक जलस्रोत असल्याने खोदकामाचा खड्डा पाण्याने भरत आहे. डिझेल पंपाच्या साह्याने हे पाणी बाहेर काढावे लागत आहे. या जलस्रोतांचे जतन करून ते पाणी थेट गोदापात्रात सोडण्याची व्यवस्था केल्यास नदी नेहमी प्रवाहित राहू शकेल, असे पर्यावरणप्रेमी मत व्यक्त करीत आहेत.