पंचवटी- अनेक समस्यांनी दिंडोरी रोडवरील मेरी शासकीय वसाहतीला समस्यांनी विळखा घातला आहे. कचऱ्याचे ढीग, इमारतीला लटकलेले पाइप त्यातून निघणारे सांडपाणी, फुटलेल्या ड्रेनेजमधून वाहणारे दुर्गंधीयुक्त पाणी, चोकअप चेंबर, मोडकळीस आलेले दरवाजे, काचा, खिडक्या, इमारतींची मोठ्या प्रमाणात झालेली दुरवस्था तसेच मोकाट प्राण्यांचा उपद्रव, ओस इमारतीत मद्यपींचा वावर, इमारतीच्या छतावरून खोल्यांमध्ये पडणारे पावसाचे पाणी, असे चित्र सध्या दिसून येत आहे. वसाहतीत बोटावर मोजण्याइतकेच कुटुंब राहत असले तरी त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते. पावसाळ्यात जीव मुठीत धरूनच राहावे लागत असल्याने रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली.