Nashik Municipal Corporation Election
sakal
पंचवटी: मतदानाला अवघे काही तास उरलेले असतानाच राजकीय वातावरण तापवणारी गंभीर घटना पंचवटीत घडली आहे. शिवसेना पक्षाचे प्रभाग क्रमांक ६ मधील उमेदवार कमलेश बोडके याच्यावर अपहरण व मारहाणीचा गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाला आहे. विरोधात प्रचार करतो, या कारणावरून बांधकाम ठेकेदाराचे अपहरण करून अमानुष मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला असून, या घटनेमुळे गुरुवारी (ता. १५) होणाऱ्या मतदान प्रक्रियेवर सावली निर्माण झाली आहे.