पंचवटी- मखमलाबाद शिवारातील शांतीनगर तसेच तवली डोंगर आदी परिसरात मंगळसूत्र चोरी, मोबाइल चोरी, दुचाकी चोरी आणि घरफोडींसारख्या गुन्ह्यांत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे पदाधिकारी अंकुश काकड यांनी म्हसरूळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अंकुश चिंतामण यांना निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे.