Gyaneshwar Kakad
sakal
पंचवटी: भारतीय जनता पक्षातील उमेदवारीवरून सुरू असलेला वाद अर्ज माघारीच्या दिवशी विकोपाला गेल्याचे पाहायला मिळाले. भाजपचे माजी पदाधिकारी ज्ञानेश्वर काकड यांनी बंडखोरी कायम ठेवावी, यासाठी त्यांच्या समर्थकांनी चक्क त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना राहत्या घरात कोंडून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार मखमलाबाद रोडवरील शांतिनगर परिसरात घडला. पक्षाचा दबाव येऊ नये म्हणून घराला बाहेरून कुलूप लावल्याची चर्चाही परिसरात रंगली होती.