Nashik Crime News : पंचवटीत भरबाजारात तरुणावर हल्ला ; १९ वर्षांच्या सूरजचा खून
19-year-old Suraj killed in Panchvati Area of Nashik : पंचवटीतील बुधवार बाजारात सूरज दास या १९ वर्षीय तरुणाचा भर गर्दीत संशयितांनी चाकूने खून केल्याची खळबळजनक घटना घडली.
पंचवटी: गोदाघाटावर भरणाऱ्या बुधवारच्या बाजारात वडिलांबरोबर भाजीपाला खरेदीसाठी आलेल्या १९ वर्षीय मुलाचा तीन ते चार संशयितांनी चाकूने वार करून खून केला. नंदलाल ऊर्फ सूरज जगनकुमार दास (रा. परदेशी भवन, सीतागुंफा, पंचवटी) असे मृत तरुणाचे नाव आहे.