Ravi Sanjay Ushile
sakal
पंचवटी: पेठ रोडवरील अश्वमेघनगरमध्ये शनिवारी (ता. ३) रात्री पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खून झाला. रवी संजय उशिले (वय २३, रा. सप्तरंग सोसायटीमागे, हरिहरनगर, पेठ रोड) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी दोन हल्लेखोरांना अवघ्या दोन तासांत विल्होळी येथून ताब्यात घेण्यात आले असून, दोघे संशयित काका-पुतणे आहेत. महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता.