Crime
sakal
पंचवटी: शहरात वाढत्या वाहन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पंचवटी पोलिसांनी राबवलेल्या विशेष मोहिमेला मोठे यश आले आहे. दिंडोरी रोड परिसरात सापळा रचून पोलिसांनी दुचाकी चोरणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश केला असून, दोन आरोपींसह दोन विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून २ लाख २५ हजार रुपये किमतीच्या एकूण ६ चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.