Nashik News : नाशिकच्या शिरपेचात मानाचा तुरा! ६० फुटी भव्य 'पसायदान' प्रतिमेची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

Grand Pasaydan Statue Unveiled on Godavari Banks : पंचवटी येथील गोदावरी तीरावर उभारलेली ६०×५५ फूट ‘पसायदान प्रतिमा’, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त साकारलेला भव्य भक्तिमय देखावा.
Nashik Panchavati event

Nashik Panchavati event

sakal 

Updated on

पंचवटी: गोदावरीच्या पावन तीरावर बुधवारी भक्तीचा महासागर उसळला. संतश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ७५० व्या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त नाशिक तालुक्यातील म्हसरूळ येथील वडजे मळ्यात उभारलेली ६० फूट रुंद व ५५ फूट उंच भव्य ‘पसायदान प्रतिमा’ भक्तांच्या डोळ्यांत अभिमानाचे अश्रू आणणारी ठरली. अध्यात्म आणि विज्ञान-तंत्रज्ञानाचा संगम साधत साकारलेल्या या प्रतिमेने वारकरी संप्रदायाची परंपरा एका वेगळ्याच उंचीवर नेली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com