टूडे साठी
----------------
पंचवटीतील शाळांना शनिवारी सुटी जाहीर
शिक्षण विभागाचा आदेश; रस्ते बंद राहणार
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २८ : सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहण कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या शिक्षण विभागाने पंचवटी विभागातील शाळांना सुटी जाहीर केली आहे. मनपा शाळा, खाजगी अनुदानित आणि विनाअनुदानित अशा एकूण ३५ शाळांचा समावेश आहे.
शिक्षण विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार, ३१ ऑक्टोबरला रामतीर्थ, पंचवटी येथे राष्ट्रपती यांच्या हस्ते कुंभमेळा ध्वजारोहण कार्यक्रम होणार आहे. त्यादिवशी शनिवार असल्याने मनपाच्या सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळा सकाळी ७.३० ते १०.०० या वेळेत वगळता सुटी असतीलचं, परंतु सुरक्षेच्या दृष्टीने मालेगाव स्टँड, निमाणी, पंचवटी कारंजा या ठिकाणी रस्ते बंद राहणार आहेत. पोलिस विभागाच्या पत्राच्या अनुषंगाने राष्ट्रपतींच्या दौरा मार्गात कोणत्याही प्रकारची अव्यवस्था होऊ नये, सुटी जाहीर करण्यात आहे. तसेच या व्यतिरिक्त अन्य खाजगी संस्थांच्या शाळेस वाहतुकीस अडथळा वाटत असल्यास संस्थास्तरावर योग्य तो निर्णय घ्यावा, विद्यार्थी सुरक्षा प्राधान्याने लक्षात घेऊन कार्यवाही करावी, असेही आदेशात म्हटले आहे. सुटीच्या यादीत मनपा शाळा, खाजगी अनुदानित आणि विनाअनुदानित अशा एकूण ३५ शाळांचा समावेश असून यामध्ये ए. पी. पटेल विद्यालय निमाणी, अभिनव बाल विकास मंदिर, आदर्श प्रायमरी इंग्लिश मिडियम, बाल शिक्षण मंदिर, ब्रह्मा व्हॅली, डी. एन. पाटील माध्यमिक विद्यालय, जे. एस. रुंगठा हायस्कूल, जनता विद्यालय, काकासाहेब देशमुख विद्यालय, लोकनेते व्यंकटराव हिरे कनिष्ठ महाविद्यालय, एम. आर. सारडा कन्या विद्यामंदिर, मोहिनीदेवी रुंगटा प्राथमिक विद्यामंदिर, शासकीय मुलींची शाळा, के. टी. एच. एम. कॉलेज, के. व्ही. एन. नाईक कॉलेज, मराठा हायस्कूल, आर. के. कालानी ज्युनिअर कॉलेज, रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालय, नवभारत प्रा. वि. मं. पंचवटी, मनपा शाळा क्र. ४०, ३६, १२, १३, ११, १०, ३७, ३८, ३९ आदी शाळांचा समावेश आहे.
---------------------