Nashik Suryanarayan Temple
sakal
प्रशांत भरवीरकर- नाशिक: पंचवटीतील रामतीर्थावर, गंगा-गोदावरी मंदिराच्या सान्निध्यात वसलेले सूर्यनारायण मंदिर हे केवळ एक देवस्थान नसून, वैदिक सूर्योपासनेची जिवंत परंपरा जपणारे आध्यात्मिक संशोधनस्थळ आहे. हे मंदिर अक्कलकोट स्वामी समर्थांचे अंतरंग शिष्य, वेदशास्त्रसंपन्न आणि प्रकांड पंडित घोलप स्वामी यांच्याशी निगडित असून, त्यामागे गहन आध्यात्मिक आणि तात्त्विक अधिष्ठान दडलेले आहे.